This Luck is not by Chance but Preplanned -महावीर सांगलीकर
मी माझ्या आयुष्यातील सोनेरी काळात प्रवेश केला आहे. हात घालीन तिथं अविश्वसनीय यश, प्रचंड प्रसिद्धी, मिळणारा मान-सन्मान, खचलेल्या लोकांना उभारी देण्याची माझ्याकडे आलेली अनोखी ताकत, माझ्या प्रतिभेला आलेली आगळी बहर, प्रचंड मानसिक समाधान, पैसाच पैसा..... आणखी काय पाहिजे?
हे सगळं शक्य झाले, ते न्यूमरॉलॉजीमध्ये मी केलेल्या कांही प्रयोगांमुळे.
कोणतेही प्रयोग हे आधी प्राण्यांवर केले जातात, पण हे प्रयोग मी डायरेक्ट स्वत:वरच केले. त्यात कसलाही धोका नाही, उलट फायदाच फायदा आहे याची खात्री झाल्यावरच मी ते आणखी एका विश्वासू व्यक्तीवर केले. त्याचा त्या व्यक्तीला माझ्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. माझे यश याच्यात आहे की माझ्यापेक्षा दुस-याला जास्त फायदा झाला म्हणून माझ्या मनात जेलसी हा भाव अजिबात तयार झाला नाही, उलट कधी न झाला असेल इतका आनंद झाला.
दुस-याच्या यशासाठी झटणे यातच माझे यश आहे हे मला केवळ न्यूमरॉलॉजीच्या डीप स्टडीमुळेच कळले.
पण याच्यामागे फार मोठी तपस्या आणि त्याग आहे. मला अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले. अनेक निगेटिव्ह लोकांना माझ्या आयुष्यातून दूर करावे लागले. टी.व्ही., सिनेमा, बातम्या बघणे सोडून द्यावे लागले. पेपर वाचणे देखील सोडून द्यावे लागले. निरर्थक गप्पा, टाईम पास यांना पूर्ण फाटा द्यावा लागला. एकांतामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवावा लागला. आपल्या हातून कांही चूक झाल्यास ‘सेल्फ पनिशमेंट’ करावी लागली.
मी माझ्या मिशनवर पूर्ण लक्ष केंद्रित केल्यानेच मी हे यश मिळवू शकलो.
पुढे काय? मी स्पष्ट बघतोय.... यापेक्षाही भव्य दिव्य माझ्याकडून होणार आहे....
मी आभारी आहे सर्वांचा... मित्रांचा, कारण त्यांनी मला संकट काळात मदत केली. .. शत्रूंचा, कारण त्यांच्यामुळे मला बरेच कांही शिकायला मिळाले.... विद्रोही मानसिकतेच्या चळवळ्यांचा, धर्मवादी आणि जातीय वाद्यांचा, कारण भरकटलेले जीवन आणि स्टुपिडिटी कशाला म्हणतात ते मला त्यांच्या वागण्यामुळे आणि ते ज्या विचार सरण्यांना बळी पडले आहेत, त्यामुळे कळून चुकले.
पण या सर्वांपेक्षा मी आभारी आहे माझ्या कांही क्लाएंट्सचा, ज्यांना मोटीव्हेट करायला जाऊन मीच मोटीव्हेट झालो.
महावीर सांगलीकर
Numerologist & Motivator
Cell No. 814 970 3595, 962 372 5249
No comments:
Post a Comment