-महावीर सांगलीकर
9145318228
दिवाळी अमावास्येला भारतात आणि इतरही अनेक देशांमध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मी पूजेबद्दल अनेकांनी लिहिले आहे, पण मी आज एका वेगळ्या मुद्द्यावर लिहित आहे.
अनेकांचा असा प्रश्न असतो की बिल गेट्स लक्ष्मी पूजन करत नाही, तरीही तो अतिश्रीमंत आहे. तेंव्हा श्रीमंत होण्याचा आणि लक्ष्मी पूजनाचा काय संबंध? वरकरणी हा प्रश्न तर्कनिष्ठ वाटतो, पण प्रत्यक्षात तो अज्ञानातून येणारा प्रश्न आहे.
हे मान्य आहे की केवळ लक्ष्मी पूजन करून धन-संपत्ती मिळत नसते, तर त्यासाठी तुम्ही पैसे मिळवण्याचे कांहीतरी उद्योग करावे लागतात. तुम्ही जर ते करत असाल आणि लक्ष्मी पूजनही करत असाल तर काय होते ते पहा. जेंव्हा तुम्ही लक्ष्मी पूजन करता तेंव्हा तुमच्या पुढे धन-संपत्तीची देवता लक्ष्मी असते, त्याच बरोबर प्रत्यक्ष धन (नोटा, नाणी, सोने, चांदी इत्यादी). पूजा करत असताना हे सगळे तुमच्या उघड मनात साठवले जाते आणि नंतर ते तुमच्या सुप्त मनात जाते. (आधुनिक भाषेत बोलायचे तर हे धन-संपत्तीचे व्हिज्युअलायझेशन असते. ही पूजा सहेतुक असते. म्हणजे या पूजेमागे धन-संपत्तीची देवता लक्ष्मी हिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि पुढेही धन-संपत्ती मिळत राहो असे दुहेरी हेतू असतात.
या पूजेचा परिणाम म्हणजे पुढील काळातही तुमच्याकडे धन-संपत्ती आकर्षित होत रहाते, आणि तिचे प्रमाणही वाढत जाते.
जगात वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या समाजांमध्ये वेग वेगळी व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स वापरली जातात. कोणी कोणते टेक्निक वापरावे हा ज्याचा-त्याचा किंवा जिचा तिचा प्रश्न आहे. बिल गेट्स लक्ष्मीपूजन करत नाही हा मुद्दा गैरलागू आहे. बिल गेट्स सारखे जिनिअस, हाय आय क्यू असणारे लोक व्हिज्युअलायझेशनसाठी आणखी वेगळे टेक्निक वापरत असतात. ते टेक्निक सगळ्यांनाच जमेल असे नाही. लक्ष्मी पूजन ही व्हिज्युअलायझेशनची सगळ्यात सोपी पद्धत आहे.
हेही वाचा:
No comments:
Post a Comment