Advt.

Advt.

Sunday, 19 July 2015

लग्न होत नाही......? (मुलींसाठी)

-महावीर सांगलीकर
8149703595

अनेक तरुण-तरुणींचे लग्न वेळेवर होण्यात अनेक अडथळे येत असतात. चाळीशी ओलांडली तरी लग्न झालेले नाही अशा मुली समाजात मोठ्या संख्येने आहेत.  असे होण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे असतात. त्यातले एक महत्वाचे कारण म्हणजे मुलींच्या आपल्या जोडीदाराविषयी अवास्तव अपेक्षा. भरीस भर म्हणून मुलीच्या पालकांच्यांही कांही वेगळ्या अवास्तव अपेक्षा असतात. (वास्तव अपेक्षा कशा असाव्यात या विषयावरील माझी शिवानीचं लग्न ही कथा वाचावी).

वेळेवर लग्न न होण्यामागे अवास्तव अपेक्षेबरोबरच दुसरे एक मानसिक कारणही आहे. ते म्हणजे अनेक मुलींच्या मनात ‘आपले लग्न होणारच नाही’ असा न्यूनगंड तयार झालेला असतो. त्यामुळे त्या उदास राहू लागतात. ‘आपले लग्न होणार नाही’ असे वाटत राहणे म्हणजे स्वत:च स्वत:ला तशी सूचना देत रहाणे (सेल्फ सजेशन) होय. हा स्वसंमोहनाचा (Self Hypnosis) प्रकार आहे. यामुळे अशा मुली आपल्या लग्नाची आशा पूर्णपणे सोडून देतात, आपल्या लग्नाचे स्वप्न बघत नाहीत. याचा होणारा परिणाम म्हणजे खरेच अशा मुलींचे लग्न होत नाही.

ज्या मुलींच्या मनात असा न्यूनगंड तयार झालेला असतो त्यांनी त्यातून लवकरात लवकर बाहेर पडले पाहिजे. ‘माझे लग्न होणारच’, ‘मला पाहिजे तसा मुलगा लवकरच माझ्या आयुष्यात येणार आहे’ असाच विचार या मुलींनी केला पाहिजे, तशी स्वप्ने बघायला पाहिजेत आणि आपल्याला आवडेल मुलाशी अवास्तव अपेक्षा न बाळगता लग्न करायची तयारी ठेवली पाहिजे.  आपल्या लग्नाविषयी पॉझिटीव्ह राहिले पाहिजे. असे केल्यास या मुलींची लग्ने लवकर होण्यास मदत होईल.

हेही वाचा:
शिवानीचं लग्न: भाग 1
गौरीचं लग्न

No comments:

Post a Comment