Advt.

Advt.

Wednesday, 15 July 2015

मुलींचा ड्रेस कोड आणि पुरुषांची मानसिकता

-महावीर सांगलीकर

मुलींच्या बाबतीत साडी हा ड्रेस आता कालबाह्य झालेला आहे. बहुतेक मुली, मग त्या उत्तरेतील असो वा दक्षिणेतील, आता पंजाबी ड्रेस वापरतात. कित्येक मुली तर या ड्रेस बरोबर बुरखाही वापरतात. खरे म्हणजे हा इस्लामिक ड्रेस कोड आहे पण पुरुषांना, अगदी सनातनी, हिंदुत्ववादी पुरुषांना देखील तो अजिबात खटकत नाही. याउलट एखाद्या मुलीने जीन्सची प्यांट आणि टी शर्ट किंवा शर्ट असा ड्रेस वापरला तर ते मात्र अनेक पुरुषांना खटकते. असे का?

खरे म्हणजे मुलींनी प्यांट-शर्ट वापरण्यात चुकीचे कांहीच नाही. या ड्रेसमध्ये त्यांचे बहुतांश अंग झाकले गेलेले असते. हा ड्रेस आणि साडी-ब्लाऊज यांच्यात तुलना करून बघा. तरीही या ड्रेसला पुरुषांचा विरोध असण्याचे कारण हे सरळ सरळ पुरुषी सत्तेवर झालेले झालेले स्त्रियांचे आक्रमण आहे. हा ड्रेस पुरुषांचा असूनही स्त्रिया तो घालतात म्हणजे काय? पुरुषांच्या इगोला त्यामुळे मोठा धक्का पोहोचतो. या विरोधामागे संस्कृतिरक्षण वगैरे जी कारणे दिली जातात ती तकलादू आहेत. खरे दुखणे पुरुषांचा इगो दुखावला जाणे हेच आहे.   

1 comment: